पाचोऱ्यात आक्रोश मोर्चा : निपाणे प्रकरणातील कारवाईस दिरंगाईचा केला निषेध 

 

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | निपाणे प्रकरणी १२ दिवस उलटुनही संशयित आरोपींना अटक करण्यात आली नसुन आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी आज दि. २६ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजता आंबेडकरी समाज, सामाजिक संघटना तसेच निपाणे गावातील ग्रामस्थांनी शहरातील रेल्वे स्थानक रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळ्या पासुन ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत आक्रोश मोर्चा काढन्यात आला.

या मोर्चात सहभागी झालेल्यांनी संशयीत आरोपींविरुद्ध जोरदार घोषणाबाजी करत पोलिसांनी आरोपींना तात्काळ अटक करावी अशा मागणीने परिसर दणाणून सोडला होता.

दरम्यान, निपाणे ता. पाचोरा येथे दि. १२ सप्टेंबर रोजी मध्यरात्रीच्या सुमारास एका दलित समाजाच्या मृत महिलेचा अंत्यविधी गावातील स्मशानभूमीमध्ये होवु देण्यास मा. जि. प. सदस्य तथा शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांनी मज्जाव केल्याची घटना घडली होती. दरम्यान दि. १४ सप्टेंबर रोजी रावसाहेब पाटील यांचेसह १० जणांविरुद्ध पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये जातीवाचक शिविगाळ करत जीवे ठार मारण्याची धमकी दिल्याने गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

मोर्चात समता सैनिक दलाचे जिल्हा उपाध्यक्ष किशोर डोंगरे, अॅड. अविनाश भालेराव, प्रविण ब्राम्हणे, मा. नगरसेवक खंडु सोनवणे, समाधान धनुर्धर, विकी जगताप, सुनिल शिंदे, विशाल बागुल, रविंद्र सोनवणे, समाधान संसारे, बाळु धनुर्धर, दिगंबर धनुर्धर, भगवान भालेराव, शंकर सोनवणे, दिपक सोनवणे, गोपाल धिवरे, सागर अहिरे, अर्जुन सोनवणे, संतोष खैरे, विश्वनाथ अहिरे, सुनिल कदम, नामदेव शिरसाठ, भिमराव लहासे, दशरथ धनुर्धर, भाऊराव सोनवणे, प्रदिप जाधव सह मोठ्या संख्येने आंबेडकरी समाज, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी व सदस्य तसेच निपाणे येथील मृत महिलेचे नातेवाईक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आक्रोश आंदोलनानंतर उपस्थितांतर्फे आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या मागणीसाठी पोलिस स्टेशनमध्ये पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांना निवेदन देण्यात आले. आरोपींना तात्काळ अटक न झाल्यास आंदोलन तीव्र करण्यात येणार असल्याचेही पोलिस प्रशासनास दिलेल्या निवेदनात नमुद करण्यात आले आहे.

Protected Content