पाचोऱ्यातील डॉ. स्वप्निल पाटील रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन इंग्लंडतर्फे सन्मानित

 

पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील लोहटार येथील मुळ रहिवाशी व हल्ली पाचोरा शहरातील गणेश कॉलनी भागात रहिवास असलेले विधीतज्ञ अॅड. प्रल्हादराव पाटील आणि गो. से. हायस्कुल मधुन नुकत्याच सेवा निवृत्त झालेल्या पर्यवेक्षीका प्रमिला प्रल्हादराव पाटील यांचे सुपूत्र तथा येथील सिध्दीविनायक मल्टीस्पेशालिटी हाॅस्पिटलचे संचालक डॉ. स्वप्निल प्रल्हादराव पाटील यांना डायबेटीस व किडनी मॅनेजमेंटसाठी रॉयल कॉलेज ऑफ फिजिशियन युनायटेड किंगडम (इंग्लंड) तर्फे डिग्री आणि अवॉर्डने नुकतेच सन्मानित करण्यात आले आहे.

डॉ. स्वप्निल पाटील हे गो. से. हायस्कूल मधुन एस.एस.सी व एच. एस. सी. परिक्षेत गुणवत्ता यादीत येवुन पुढील वाटचालीस सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी एम.बी.बी.एस., एम. डी. परिक्षेत गोल्ड मेडल प्राप्त करून पुनश्च एकदा यशाचा तुरा रोवला. तद्नंतर आपल्या जन्मगावी व कर्मभुमित एक अद्ययावत वैद्यकीय सेवा देणारे हाॅस्पिटल उभारावे म्हणुन त्यांनी सिद्धीविनायक मल्टीस्पेशालीटी हॉस्पीटल शहरात सुरु केले आहे. त्यांना यात भरभरून यश ही मिळत आहे. सद्यस्थितीत या हाॅस्पिटलमध्ये आजाराचे, विकारांचे तज्ञ डॉक्टरांची दिवसागणिक भर पडत आहे. यामुळे जिल्हास्तरापातळीवर मिळणारी उपचारपद्धती आता तालुकास्तरावर कमी अंतरावर व कमी वेळेत मिळत असल्याने रुग्णांची आर्थिक बचत होत असून जागेवरच कमी वेळात उपचार मिळत असल्याने जिवीतहानी होण्याचे प्रमाणात घट झाली आहे. सदर पुरस्काराने डाॅ. स्वप्निल पाटील यांचे सर्व स्तरातून कौतुक केले जात आहे.

Protected Content