पाचोरा, प्रतिनीधी । कोरोना माहामारीच्या काळात पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी केलेल्या कार्याचा गौरव करण्यासाठी पाचोरा आर्यन युवा फाउंडेशनतर्फे त्यांचा सन्मान व सत्कार करण्यात आला.
कोरोना काळात पारनेर तालूक्यातील राष्टवादी काॅग्रेस पक्षाचे आमदार निलेश लंके यांनी लोकप्रतिनीधी मनात आले तर काय करू शकतो याच उत्तम उदाहरण जगासाठी आहे. निलेश लंके हे महाराष्ट्रात नाही तर संपुर्ण देशात एकमेव असे आमदार आहेत ज्यांनी १ हजार १०० बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. एक सामान्य परिवारातील व्यक्ती आमदार लंके हे त्यांच्या साधेपणा व त्यांचे उत्कृष्ट कामगिरीमुळे सर्व क्षेत्रातील, पक्षातील व सामाजिक संघटनाचे लोक त्यांचे चाहते झाले आहेत. त्यांनी महाराष्ट्रात नाही तर संपूर्ण देशात आदर्श निर्माण केला आहे. या बहुआयामी व्यक्तीची भेट घेऊन त्यांच्या कार्याचा सन्मान करणे सोबतच त्यांचे अनमोल मार्गदर्श घ्यावे या हेतुने आर्यन युवा फाऊंडेशनच्या सदस्यांनी सदिच्छा भेट घेतली. अशा थोर समाजसेवकास आर्यन युवा फाऊंडेशनतर्फे अभिनंदन व्यक्त करण्यात आले. यावेळी आर्यन युवा फाऊंडेशनचे सल्लागार यशवंत मांडोळे, अध्यक्ष आर्यन मोरे, उपाध्यक्ष भूषण पाटील, सचिव आनंद शिंदे, अशोक मोरे, दिपक पाटील उपस्थित होते.