पाचोरा, : प्रतिनिधी ! महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण तथा मुंबई उच्च न्यायालय व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण यांच्या आदेशानुसार पाचोरा येथे तालुका विधी सेवा समिती मार्फत लोक न्यायालय शुक्रवारी पाचोरा न्यायालयात आयोकीत करण्यात आले होते लोक न्यायालयात दिवाणी व फौजदारी तसेच वादपूर्व खटल्यांचा निपटारा होवून सरकार खाती २५ लाख १० हजार ३१८ रुपये जमा झाले.
लोकन्यायालय कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता सोशल डिस्टंगशिंगचे पालन करत व सॅनिटायझरचा वापर करून घेण्यात आले.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी, सह दिवाणी न्यायाधीश एम. एच. हक, २ रे सह दिवाणी न्यायाधीश जी. एस. बडगुजर, पंचायत समिती गटविकास अधिकारी सचिव अतुल पाटील, वकील मंचाचे अध्यक्ष अॅड. प्रविण पाटील, उपाध्यक्ष अॅड. अरुण भोई, सचिव अॅड. के. एम. सोनवणे, पंच न्यायाधीश अॅड. गोपाळ पाटील, जेष्ठ वकील मंडळी उपस्थित होते.
तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष एफ. के. सिद्दीकी यांनी आवाहन केले की, पुढे होणा-या लोक न्यायालयात जास्तीत जास्त सहभाग नोंदवून लोकन्यायालय यशस्वी करुन या संधीचा लाभ घ्यावा
. लोकन्यायालय यशस्वीतेसाठी तालुक्यातील सर्व ग्रामसेवक वृंद, स्टेट बँक कर्मचारी, पाचोरा दूरसंचार कर्मचारी, न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक ए. आर. पाटील, तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहाय्यक बी. एम. भोसले, कनिष्ठ सहाय्यक दिपक के. तायडे, न्यायालयातील व पाचोरा पोलीस स्टेशन कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.