पाचोरा, प्रतिनिधी । तालुक्यातील कळमसरा येथे राष्ट्रसंत गाडगे महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त माणुसकी समूहातर्फे ३१ दात्यांनी रक्तदान करून अभिवादन करण्यात आले.
सु-लक्ष्मी सेवाभावी संस्था व माणुसकी समूहातर्फे आयोजित रक्तदान शिबिराची सुरुवात राष्ट्रसंत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेचे पूजन समाजसेवक गजानन क्षिरसागर व समाजसेविका वंदना चौधरी, डॉ. कमलेश पाटीदार, अशोक चौधरी यांच्या हस्ते करण्यात आले. समाजसेवक सुमित पंडित व गजानन क्षीरसागर यांनी गाडगेबाबांची प्रेरणा घेवून समाजसेवेला सुरवात केली आहे. माणुसकी रुग्णसेवा समुहाच्या माध्यमातून गरजुनां मदतकार्य चालु केला आहे. समाजासाठी निस्वार्थ सेवेचे उपक्रम ते नेहमी राबवित असतात.
जळगाव जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा लक्षात घेता रक्तदान शिबिर घेऊन राष्ट्रसंत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी करण्यात आली. यावेळी पुढील ३१ रक्तदात्यांनी रक्तदानात सहभाग नोंदविला. त्यापैकी विनोद तेली, राजेंद्र हटकर, अक्षय चौधरी, अतुल पाटील, सचिन माळी, किरण गायकवाड, आकाश भाकरे, कल्पेश चौधरी, गजानन कावडी, राजेंद्र पाटील, अमोल घोडके, विलास परदेशी, जितेंद्र सरोदे, कडूबा पाटील, शुभम उशीर, निलेश पाटील, देवेंद्र थोरवडे, जयंत काळे, चेतन चौधरी, किशोर डांबरे, तुषार चौधरी आदिनीं रक्तदान केले. रक्त संकलनाचे कार्य डॉ. कमलेश पाटकरी, डॉ. मोनिरा, भरत गायकवाड, विलास चनाल, रेड प्लस पाचोरा टीम यांनी केले. यशस्वीतेसाठी माणुसकी ग्रुप जळगाव जिल्हाध्यक्ष गजानन क्षीरसागर, दत्तात्रय तेली, गजानन पाटील, विकास माळी, सोपान न्हावी व कळमसरा गावकऱ्यांनी सहभाग नोंदवला. व माणुसकी ग्रुप सदस्य यांनी सहकार्य केले.