पाचोरा, प्रतिनिधी | स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त सुरू असलेला “पॅन इंडिया अवनरेस ॲन्ड अवरनेस प्रोग्राम’ येथील न्यायालयात आज उत्साहात संपन्न झाले. तालूका विधी सेवा समिती व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने हे कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण दिल्ली यांच्या निर्देशानुसार तथा महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण जळगांव यांचे आदेशानुसार स्वातंत्रयांच्या अमृत महोत्सव निमित्त ” पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आऊटरिच प्रोग्राम ” या ४४ दिवसांच्या कार्यक्रमाचे १४ नोव्हेंबर रोजी दिवाणी व फौजदारी न्यायालय पाचोरा येथे तालूका विधी सेवा समिती व वकिल संघ यांच्या संयुक्त विद्यमाने सांगता करण्यात आली. यावेळी मंचावर तालुका विधी सेवा समितीचे पदसिध्द अध्यक्ष न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे, उपविभागीय अधिकारी विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे, पोलिस उपनिरीक्षक विकास पाटील, ग्रामीण रुग्णालयाचे वैदयकिय अधिकारी डॉ. अमित सांळुखे, बालविकास अधिकारी पदम परदेशी, प्राचार्य डॉ. वासुदेव वले, मुख्याध्यापक सुधीर पाटील, वकिल संघाचे अध्यक्ष ॲन्ड प्रविण पाटील यांची प्रमुख उपस्थिीती होती. तत्पूर्वी कार्यक्रमाची सुरूवात प्रभात फेरीने करण्यात आली. पाचोरा न्यायालयातुन प्रभात फेरी निघुन श्री. गो. से. हायस्कुल, राजे संभाजी महाराज चौक, भुयारी मार्ग, छत्रपती शिवाजी महाराज चौक, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळयाकडुन पाचोरा रेल्वे स्थानक पुलावरून येवुन पुन्हा पाचोरा न्यायालय येथे प्रभात फेरी समाप्त झाली. यावेळी न्यायालयीन अधिकारी, कर्मचारी, शासकिय अधिकारी, कर्मचारी, वकिल संघाचे पदाधिकारी, वरिष्ठ व कनिष्ठ सदस्य, पोलीस स्टेशन कर्मचारी, टॅफीक कर्मचारी, विधी शाखेचे विदयार्थी यांची मोठया संख्येने उपस्थिती होती. प्रभात फेरी चे समापन झाल्यानंतर न्यायालयाच्या प्रांगणावर जनजागृती शिबीराची सुरूवात झाली. यावेळी सर्व प्रथम सर्व मान्यवरांचे तालुका विधी सेवा समिती व वकिल संघ यांच्या वतीने शब्द सुमनांनी स्वागत करून प्रभात फेरीत उस्फुर्तपणे सहभाग घेवुन प्रभात फेरी यशस्वी केल्याने दिपक तायडे यांनी अभिनंदन केले. यानंतर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन प्रा. शिवाजी शिंदे यांनी हाती घेत कार्यक्रमास सुरूवात केली. सर्वप्रथम उपस्थित मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देवून सत्कार करण्यात आला. यावेळी न्यायाधीश एफ. के. सिद्दीकी यांचा सत्कार ॲड. प्रविण पाटील, सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांचा सत्कार ॲन्ड अरूण भोई, प्रांतधिकारी विक्रम बांदल यांचा सत्कार ॲन्ड कैलास सोनवणे, तहसिलदार कैलास चावडे यांचा सत्कार ॲन्ड प्रशांत नागणे, पोलीस उप निरीक्षक विकास पाटील यांचा सत्कार ॲन्ड राजेंद्र परदेशी, वैदयकिय अधिकारी डॉ. अमित सांळुखे यांचा सत्कार ॲन्ड भाग्यश्री महाजन, बालविकास अधिकारी पदम परदेशी यांचा सत्कार ॲन्ड अनुराग काटकर, प्राचार्य डॉ. वासुदेव वले यांचा सत्कार ॲन्ड मनिषा पवार, मुख्याध्यापक सुधीर पाटील यांचा सत्कार ॲन्ड स्वप्निल पाटील यांच्या हस्ते करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक वकिल संघाचे अध्यक्ष ॲन्ड प्रविण पाटील यांनी करतांना स्वातंत्रयांच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवरनेस अॅड आउटरिच प्रोग्राम” या ४४ दिवसांच्या कार्यक्रमाचे करण्यात येत आहे. हे नमूद केले. त्यानंतर सहाय्यक अधिक्षक जी. आर. पवार यांनी स्वातंत्र गीत सादर केले. जनजागृती शिबीर मध्ये “राईट्स ऑफ चिल्ड्रेन” या विषयांवर ॲन्ड शांतीलाल सौंदाणे यांनी बालकांविषयीचे अधिकारांची माहिती दिली. तसेच पो.उ.नि. विकास पाटील यांनी सायबर काईम या विषयी महत्वपूर्ण माहिती दिली. यानंतर स्वातंत्रयांच्या अमृत महोत्सव निमित्त “पॅन इंडिया अवरनेस ॲन्ड आउटरिच प्रोग्राम” या अंतर्गत घेण्यात आलेल्या “बेटी बचाव बेटी पढाव” या विषयी चित्रकला स्पर्धेतील विजेत्या विदयार्थ्यांना पारितोषिक प्रदान करण्यात आले. प्रथम पारितोषिक कु. भुमी जगदीश पाटील, द्वितीय पारितोषिक कु. श्वेता अनिल वाघ, तृतीय पारितोषिक संकेत जगदीश ब्राम्हणे यांनी पटकाविले. तसेच उत्तेजनार्थ पारितोषिक व स्पर्धेत सहभागी विदयार्थ्यांना प्रमाणपत्र मान्यवरांच्या हस्ते देण्यात आली. यानंतर न्यायालयीन कर्मचारी संदीप पाटील यांनी बालगीत सादर करून उपस्थिताचे मनोरंजन केले. त्यानंतर विधी शाखेचा विदयार्थी सौरभ विसपुते यांनी “चाईल्ड फेंडली लिगल सहीसेस टु चिल्ड्रेन अॅड दिअर प्रोटेक्शन स्कीम” या विषयांवर मनोगत व्यक्त केले. यानंतर जेष्ठ विधीतज्ञ जे. डी. काटकर यांनी आपल्या मनोगतामध्ये पाचोरा वकिल बार तथा संघ यांचे कौतुक करीत न्यायालयात त्यांची भुमिका विषद केली. यानंतर तहसिलदार कैलास चावडे यांनी आपल्या मनोगतातुन श्रोत्यांना हसवुन वातावरण प्रफुल्लित करून विविध शेर, कविता सांगुन न्यायाविषयी विवीध व्याख्या स्पष्ट केल्या. यानंतर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करतांना एफ. के. सिद्दीकी यांनी उपस्थिताचे कौतुक केले. तसेच गेल्या ४४ दिवसांमध्ये केलेल्या कामाचा आढावा घेत विविध योजनांची माहिती ग्रामस्तरावर पोहोचविण्यास कशी मदत झाली हे सांगितले. शेवटी आभार व्यक्त करतांना सहदिवाणी न्यायाधीश एल. व्ही. श्रीखंडे यांनी दि. २ ऑक्टोबर २०२१ ते १४ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत पॅन इंडिया अवरनेस प्रोग्राम राबविण्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे कौतुक करून अभिनंदन केले. त्यात विवीध ग्रामपंचायत, नगरपालिका प्रशासन, सामान्य रूग्णालय, महाविदयालये, विविध जि. प. शाळा, विदयालये, वाचनालय, पोलिस प्रशासन,महिला बाल विभाग, महसुल विभाग या सर्वांचे व तेथील कर्मचाऱ्यांचे आभार व्यक्त केले.
कार्यक्रम यशस्वीतेसाठी ॲन्ड .एस. पी. पाटील, ॲन्ड एस. बी. माहेश्वरी, ॲन्ड. डी. आर. पाटील, ॲन्ड. मदन मोरे, ॲन्ड, रणसिंग राजपुत, ॲन्ड. अनिल पाटील, ॲन्ड. सुनिल पाटील, ॲन्ड, मानसिंग सिध्दु, ॲन्ड. प्रशांत भावसार, ॲन्ड. संजीव नैनाव, ॲन्ड. लक्ष्मीकांत परदेशी, ॲन्ड. आर. आर. राजपुत, ॲन्ड संदीप पाटील, ॲन्ड. कल्पना खेडकर, ॲन्ड. पी. बी. पाटील, ॲन्ड. वहाब देशमुख, ॲन्ड. अविनाश सुतार, ॲन्ड विजयकुमार पाटील, विस्तार अधिकारी सुनिल पाटील, विधी शाखेचे विदयार्थी कु. चंचल पाटील, कु. भाग्यश्री महाजन, कु. अनम शेख, प्रविण माळी, तुषार नैनाव, सौरभ विसपुते, पाचोरा पो. स्टे. कर्मचारी दिपक (आबा) पाटील, विकास पाटील, राजेंद्र पाटील, प्रदीप पाटील, न्यायालयाचे सहाय्यक अधिक्षक ए. आर. पाटील, व्ही. बी. पवार, दिपक पाटील, होतीलाल पाटील, अनिल गोधने, उमेश महाजन, संदीप तोंगल, अमोल चौधरी, सुर्यभान पाटील तसेच तालुका विधी सेवा समितीचे वरिष्ठ सहायक अमित दायमा, कनिष्ठ सहायक दिपक तायडे, ईश्वर पाटील, स्वप्नील पाटील, रविंद्र पाटील, सचिन राजपुत, नितीन पाटील आदींनी परिश्रम घेतले.