पाचोरा येथील नव्याने रूजू झालेले प्रांताधिकारी यांचे विविध संघटनांतर्फे स्वागत

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा विभागात नव्याने रुजू झालेले प्रांताधिकारी भुषण अहिरे यांचे पाचोरा येथील राष्ट्रीय चर्मकार महासंघ व संत रोहिदास बहुउद्देशीय संस्थेतर्फे २३ जुन रोजी स्वागत व सत्कार करण्यात आला.

 

याप्रसंगी राष्ट्रीय चर्मकार महासंघाचे महाराष्ट्र राज्य उपाध्यक्ष पांडुरंग बाविस्कर, पाचोरा तालुका अध्यक्ष गोवर्धन जाधव, उपाध्यक्ष विठ्ठल नन्नवरे, सचिव सुपडु सावंत, ज्येष्ठ सल्लागार सिताराम पवार, सल्लागार फकिरा गांगे, किरण जाधव, गणेश नन्नवरे, महिला सदस्या सुनंदा जाधव, गीता मिमरोट, किरण गायकवाड, दगडु गायकवाड, राहुल गायकवाड, संतोष मोची, रमेश जाधव सह पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते. संत रोहिदास बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष तथा उद्योजक बंडु पवार यांनी भ्रमणध्वनीद्वारे शुभेच्छा दिल्या आहेत.

Protected Content