Home Cities पारोळा पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनानिमित्त “जनता दरबार”चे आयोजन

पाचोरा पोलिस स्टेशनमध्ये तक्रार निवारण दिनानिमित्त “जनता दरबार”चे आयोजन

0
28

पाचोरा – लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी | जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या आदेशानुसार आज पाचोरा पोलिस स्टेशन हद्दीतील नागरिकांसाठी तक्रार निवारण दिनानिमित्त “जनता दरबार” चे आयोजन पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील यांचे मार्गदर्शनाखाली करण्यात आले होते.

या “जनता दरबार” मध्ये तीन प्रलंबित प्रकरणे आप आपसात तडजोड करुन निकाली काढण्यात आले.

याप्रसंगी पोलिस निरीक्षक किसनराव नजनपाटील, सहाय्यक पोलिस निरीक्षक राहुल मोरे, विजया वसावे, प्रशिक्षणार्थी सहाय्यक पोलिस निरीक्षक किशोर वल्टे, गोपनीय शाखेचे पोलिस काॅन्स्टेबल सुनिल पाटील, नितीन सुर्यवंशी, गजु काळे, सचिन निकम, तक्रारदार नागरिकांसह पोलिस कर्मचारी उपस्थित होते.


Protected Content

Play sound