पाचोरा, प्रतिनिधी । पाचोरा नगर परिषदच्या मालकीचे नवीन शॉपिंग कॉम्प्लेक्स मधील गाळ्यांचा लिलाव कोरोना महामारीची साथ सुरू असल्याने पुढे ढकलण्यात यावा अशी मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे सचिन सोमवंशी यांनी केली आहे.
कोरोना महामारीचा गेल्या आठ नउ महिन्यांपासून संपूर्ण देशात थैमान सुरू आहे. देशात आजही साथीचा कायदाची अंमलबाजवणी सुरु आहे. लॉकडाउनमुळे लहान मोठे व्यापारी यांची व्यापारपेठ उध्वस्त झाली आहे. लहान आणि गरजू व्यापारी यांना गाळा घेण्याची सक्त गरज असतांना देखील ते आजमितीस घेऊ शकत नाही हे दुर्दैव आहे. त्यातच नगर परिषदेने या गाळ्यांचा जाहीर लिलाव दि. ४ नोव्हेंबर रोजी ठेवला आहे. यात लहान आणि गरजू व्यापारी लिलावात बोली न लावता शहरातील काही धनदांडगे या लिलाव आपल्या पंटरच्या माध्यमातून सहभागी होऊन उच्च बोली लावून अनेक गाळे घेऊन त्यानंतर त्या गाळ्यांची चढ्या भावाने विक्री करतील आणि नफा कमवतील. यातुन नगर परिषदचा सर्व सामान्य व्यापारीला न्याय देण्याचा हेतू बाजूला राहील यात शंका नाही. जिल्हाधिकारी यांनी याचा सहानुभूतीने विचार करून कोरोना महामारी पुर्णपणे हद्दपार होईपर्यंत आणि व्यापारी पेठ सुरळीत होई पावेतो हा लिलाव न करता तो पुढे ढकलण्यात यावा. त्याचसोबत लिलावाची ऑफसेट प्राईज कमी करावी जेणेकरून सर्वसामान्य व्यापारी सहभागी होऊ शकतील अशी मागणी कॉग्रेसचे सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी केली आहे.