पाचोरा नगरपालिकेतर्फे ‘नो व्हेईकल डे’ अभियानास प्रारंभ

 

पाचोरा, प्रतिनिधी । नगरपरिषद अंतर्गत “माझी वसुंधरा ‘अभियानाअंतर्गत ‘नो व्हेईकल डे’ पाळण्यात आला. या अभियानाचा शुभारंभ सायकल रॅलीद्वारे नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या प्रमुख उपस्थितीत करण्यात आला.

सायकल रॅलीचा प्रारंभ नगरपरिषद कार्यालयापासुन करून छत्रपती शिवाजी महाराज चौक, जामनेर रोड, गांधी चौक, राधाकृष्ण मंदीर, देशमुखवाडी येथे सांगता करण्यात आली. प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ पाळण्याचे आवाहन नागरीकांना नगराध्यक्ष संजय गोहील, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले. दि. २ ऑक्टोबर २०२० ते ३१ मार्च २०२१ या सहा महिन्यांचा कालावधीत ‘माझी वसुंधरा’ अभियान स्थानिक संस्थामध्ये राबविले जात आहे. जागतिक पर्यावरण दिन म्हणजेच ५ जुन २०२१ रोजी या अभियानाअंतर्गत सर्वोत्कृष्ट कार्य केलेल्या स्थानिक संस्थांना बक्षीस दिले जाणार आहे. अभियान यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांनी केले. याप्रसंगी आरोग्य निरीक्षक धनराज पाटील, कर अधिक्षक दगडू मराठे, नगररचना अभियंता मानसी भदाने, शहर समन्वयक प्रिया तायडे, फायरमन राजू कंडारे, मुकादम देविदास देहडे, राजु लहासे, राकेश फतरोड, वाल्मीक गायकवाड, निलकंठ ब्राम्हणे, विनोद सोनवणे, बापु ब्राम्हणे, आमोल अहिरे, अशोक सोनवणे, डिगंबर पाटील, व सर्व सफाई कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content