पाचोरा नगरपरिषदेतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणा-यां विरुध्द दंडात्मक कारवाई

 

पाचोरा, प्रतिनिधी । येथील नगरपरिषदेतर्फे कोरोना नियमांचे उल्लंघन करणाऱ्या दुकानदार व नागरिकांवर दंडात्मक कारवाई मुख्याधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली.

 

जिल्हाधिकारी  अभिजित राउत यांनी दिलेल्या आदेशानूसार सकाळी ७ ते ११ या विहीत  मुदतीत व्यवसाय करणे बंधनकारक आहे. मात्र, या मुदतीनंतर देखील शहरातील गंगा सुपर शॉपी यांना ५ हजार रुपये, हॉटेल गुरुकृपा रु. ५ हजार रुपये, शितल स्विटस ५०० रुपये आदी  दुकाने उघडी असल्याने या दुकानांवर धडक कारवाई करण्यात आली.  त्याच प्रमाणे ज्यांना परवानगीच नाही अशा  कापड दुकान, चप्पल बुटाची दुकाने, केश कर्तनालये, रेडिमेड कापडाची दुकाने, नामे पायल, हितेश ड्रेसेस १० हजार रुपये, सिजर्स ॲड रेझर्स केश कर्तनालय ५ हजार रुपये इतक्या रकमेचा दंड करण्यात आला. तसेच शहरात विनामास्क फिरत असलेल्या नागरीकांकडून व कोवीड – १९ अंतर्गत नियमांचे उल्लंघन करणा-या नागरीक, दुकानदार यांचेकडून एकंदरीत ५६ हजार रुपये रकमेची दंडात्मक कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई मुख्यधिकारी शोभा बाविस्कर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यांत प्रशासकिय अधिकारी प्रकाश भोसले, कर निर्धारण अधिकारी साईदास जाधव, राजेंद्र शिंपी, विलास देवकर, प्रकाश गोसावी, फायरमन भागवत पाटील, विजेंद्र निकुंभ,पोलिस प्रशासनाकडून नंदकुमार जगताप, सुनील पाटील, बापु महाजन, प्रकाश पाटील व महिला होमगार्ड, न. पा. तर्फे अनिल वाघ, प्रशांत कंडारे, भिकन गायकवाड, किशोर मराठे, संदीप जगताप, सुभाष बागुल, प्रकाश लहासे आदी अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

Protected Content