पाचोरा तालुक्यात सांगवी पाठोपाठ चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध

 

पाचोरा, प्रतिनिधी। तालुक्यातील ९ सदस्यीय चिंचपुरे  ग्रामपंचायतीसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी केवळ नऊ जणांनी अर्ज दाखल केल्याने निवड बिनविरोध झाली आहे. तालुक्यातील सांगवीनंतर चिंचपुरे ग्रामपंचायतीची  बिनविरोध निवड झाली आहे.  

चिंचपुरे ग्रामपंचायतीसाठी वार्ड क्रं. १ मधुन मंगलाबाई अनिल पाटील, प्रदिप जिवराम पवार, ज्योतीबाई अजय कुमावत, वार्ड क्रं. २ – गणेश उत्तम पवार, अक्काबाई हुसेन तडवी, वैशाली पाटील, वार्ड क्रं. ३ – शरद नाना पाटील, सचिन अनिल पाटील, गायत्री स्वप्निल देवरे हे उमेदवार बिनविरोध निवडुन आल्याने चिंचपुरे ग्रामपंचायत बिनविरोध झाली आहे. याकामी समाधान पाटील, भागवत पाटील, विजय पाटील, संतोष पाटील, निंबाजी पाटील, प्रेमराज पाटील, भास्कर पाटील, वेडुबा पाटील, नाना कुमावत, दिलीप कुमावत, राजेंद्र पाटील, ईश्र्वर पाटील, रघुनाथ पाटील, भागवत पाटील, नाना पाटील सह ग्रामस्थांनी बिनविरोध करण्यासाठी प्रयत्न केले.

Protected Content