पाचोरा तालुका कॉग्रेस सोशल मीडिया अध्यक्षपदी कल्पेश येवले

पाचोरा, प्रतिनिधी  । संकल्प सप्ताहात महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाचे काम जोरात सुरू झाले असून तालुका अध्यक्षपदी कल्पेश येवले यांची निवड करण्यात आली आहे.

खा. राहुल गांधी यांचा वाढदिवस पाचोरा कॉग्रेस संकल्प सप्ताह म्हणून साजरा करीत आहे.  यात पक्ष प्रवेश सोबतच आंदोलने, निदर्शने सह विविध सेलवर नियुक्ती करण्यात येत आहे. यातच महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या सोशल मीडियाच्या जळगाव जिल्हा अंतर्गत पाचोरा तालुका अध्यक्ष पदासाठी  जिल्हा सोशल मीडिया अध्यक्ष सचिन सोमवंशी यांनी लोहटार येथील कल्पेश येवले यांची निवड केली आहे. या नियुक्तीचे पत्र नुकतेच जळगाव जिल्हा दौऱ्यावर प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्षा तथा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख आ. प्रणती शिंदे यांच्या हस्ते देण्यात आले. तालुक्यातील प्रत्येक गावातील घराघरा पर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून कॉग्रेसची विचार धारेला पोहचविण्याचा संकल्प नुतन अध्यक्ष कल्पेश येवले यांनी घेतला आहे.

 

Protected Content