Home क्राईम पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन ठार

पाकिस्तानातील दहशतवाद्यांच्या हल्ल्यात दोन ठार

0
111

इस्लामाबाद वृत्तसंस्था । पाकिस्तानच्या कराची शहरातील स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीवर आज सकाळी नऊ वाजेच्या सुमारास दहशतवाद्यांनी हल्ला केला. दहशतवाद्यांनी इमारतीत शिरुन अंधाधुंद गळीबार केला. याशिवाय त्यांनी ग्रेनेड हल्लादेखील केला. या हल्ल्यात दोन जणांचा मृत्यू झाला तर काही लोक गंभीर जखमी झाले आहेत.

विशेष म्हणजे दहशतवाद्यांनी जेव्हा अंधाधुंद गोळीबार सुरु केला तेव्हा इमारतीत जवळपास 300 कर्मचारी होते. या हल्ल्याची माहिती मिळताच कराची पोलीस आणि पाकिस्तान रेंजर्सचे जवान तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पोलीस आणि सुरक्षा जवानांनी सुरुवातीला इमारतीत अडकलेल्या सर्व कर्मचाऱ्यांना सुखरुप बाहेर काढले. या सर्व कर्मचाऱ्यांना इमारतीच्या पाठीमागच्या गेटने बाहेर काढण्यात आले. तर पुढचे मेन गेट सील कण्यात आले.

अतिरेक्यांनी इमारतीच्या मेन गेटवर ग्रेनेड हल्ला केला. पाकिस्तानच्या जवानांनी अतिरेक्यांना तोडीस तोड उत्तर देत इमारतीत प्रवेश केला. त्यानंतर जवानांनी चार अतिरेक्यांना कंठस्नान घातले. यापैकी एका अतिरेक्याचा मेन गेटवरच खात्मा करण्यात आला. तर इतर अतिरेक्यांना स्टॉक एक्सचेंजच्या इमारतीत मारले.


Protected Content

Play sound