जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पांडे चौकात असलेल्या मॅटर्निटी हॉस्पिटलजवळून एका वृध्दाची दुचाकी अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी शनिवारी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलीस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, लिलाधन गरबड कुरकुरे (वय-६२) रा. महाबळ कॉलनी, जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. २ एप्रिल रोजी सकाळी १० वाजता खासगी कामाच्या निमित्ताने लिलाधर कुरकुरे हे त्यांची दुचाकी (एमएच १९ ए क्यू १३२२) ने पांडे चौकातील मॅटर्निटी हॉस्पिटलजवळ आले होते. त्यांनी त्यांची दुचाकी हॉस्पिटलजवळ पार्क करून लावलेली होती. अज्ञात चोरट्याने पार्किंगला लावलेली २५ हजार रूपये किंमतीची दुचाकी चोरून नेली. त्यांनी दुचाकीचा सर्वत्र शोध घेतला परंतू दुचाकी कुठेही मिळून आली नाही. अखेर शनिवारी ८ एप्रिल रोजी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक विकास सातदिवे करीत आहे.