जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पांझरापोळ पोळ परिसरात मोकळ्या प्लॉटमध्ये ठेवलेले ४ हजार ५०० रुपयांचे लोखंडी पत्रे चोरुन नेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी सोमवार, १२ डिसेंबर रोजी शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव शहरातील विठ्ठलपेठेत हर्षल लक्ष्मण कोल्हे वय २५ हे वास्तव्यास आहेत. हर्षल याची पांझरापोळ परिसरात स्मशानभूमीच्या मागे वडीलोपार्जित मोकळा प्लॉट आहे. या प्लॉटवर त्यांनी ३ लोखंडी पत्रे ठेवलेली होती. सोमवारी सकाळी ८ वाजेच्या सुमारास मोकळया प्लॉटमध्ये ठेवलेली तीनही लोखंडी पत्रे चोरुन नेल्याची घटना समोर आली. पत्रांचा इतरत्र शोध घेतला मात्र पत्रे कुठेही मिळून आली नाही. याप्रकरणी हर्षल कोल्हे यांनी दिलेल्या तक्रारीवरुन शनिपेठ पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल प्रकाश पाटील हे करीत आहेत.