पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे परिचारिकांचा सत्कार

 

पहूर, ता . जामनेर, प्रतिनिधी । आपल्या परीवाराची व स्वतः च्या जीवाची पर्वा न करता कोरोना मुक्तीच्या लढ्यात महत्वाचे योगदान देणाऱ्या परिचारिकांचा आज परिचारीका दिनाचे औचित्य साधून पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे सत्कार करण्यात आला.

जागतिक परिचारिका दिनानिमित्ताने पहूर शहर पत्रकार संघटनेतर्फे परिचारिकांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी पहूर ग्रामीण रुग्णालयात अधिपरीचारक, परीचारीका, कोरोना योध्दे म्हणून सेवा देत आहेत. या कार्याला शतशः नमन करून सर्व परिचारकांचा फिजिकल डिस्टंन्सीगचे पालन करून सत्कार करण्यात आला. यावेळी जेष्ठ पत्रकार शांताराम बापू लाठे यांनी परिचारकांच्या कार्याचा गौरव केला. याप्रसंगी ऋषिकेश भालेराव, सरोज बेडसे, दिपक वाघ यांच्यासह सर्व अधिपरिचारक व अधिपरिचारिका यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी वैद्यकिय अधिकारी डॉ.पुष्कराज नारखेडे, डॉ. जितेंद्र वानखेडे, देवेंद्र घोंगडे यांच्यासह सर्व पत्रकार बांधव उपस्थित होते.

Protected Content