पहूर ता. जामनेर प्रतिनिधी । शहरातील बसस्थानक जवळील मिठाईच्या दुकान फोडून अज्ञात चोरट्याने १५ हजार रूपये रोख व पेनड्राईव्ह चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पहूर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
अधिक माहिती अशी की, शहरातील नवीन बसस्थानकाजवळ बालुसिंह हरीलालसिंह राजपुरोहित (वय-५०) रा. साई नगर, पहूर यांचे बिकानेर मिठाईचे दुकान आहे. सकाळी ८ वाजता ते दुचाक उघडतात आणि सायंकाळी ९ वाजेच्या सुमारास दुकान बंद करतात. २८ नोव्हेंबर रोजी त्यांनी नेहमीप्रमाणे रात्री ९ वाजता दुकान बंद करून घरी निघून गेले. याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री मिठाई दुकानाचा पत्रा उचकावून आत प्रवेश करत दुकानाच्या लाकडी ड्राव्हरमध्ये ठेवलेले १५ हजार रूपये रोख आणि १०० रूपये किंमीचा सीसीटीव्हीचा पेनड्राईव्ह चोरून नेला. मिठाई दुकान फोडल्याचे २९ नोव्हेंबर रोजी सकाळी उघडकीला आहे. यात छाताचे पत्र उचकावून आत प्रवेश केल्याचे समजले. बालुसिंह राजपुरोहित यांच्या फिर्यादीवरून पहुर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक किरण शिंपी हे करीत आहे.