पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । पहूरपेठ येथे आज अजून दोन कोरोना बाधीत रूग्ण आढळून आले असून प्रशासनाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांना क्वॉरंटाईन करत त्यांच्या रहिवासाचा परिसर कंटेनमेंट झोन म्हणून जाहीर केला आहे.
पहूर पेठ येथे दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला असल्याची माहिती ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे. पहूर पेठ येथील संतोषीमातानगरात राहणार्या ४२ वर्षीय शिक्षकाला तसेच ख्वाजा नगरातील त्या बाधिताच्या कुटुंबातील १७ वर्षीय तरुणीचा स्वॅब तपासणी अहवाल पॉझीटीव्ह आला आहे. त्यांच्या संपर्कातील व कुटूंबातील लोकांचे स्वॅब घेण्यात येणार असून त्यांना संस्थात्मक विलगीकरण करण्यात येत आहे. त्यांचा रहिवास असलेला परिसर ग्रामपंचायतीच्या वतीने प्रतिबंधित करण्यात आला असून निर्जंतुकीकरण करण्यात येत आहे. नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे.