पहूर ता. जामनेर (प्रतिनिधी)। देशाच्या रक्षणासाठी पहूरचे सात तरूणांची भारतीय सैन्यात वेगवेगळ्या विभागात भर्ती झाल्याने तरूणांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. कृषी पंडित मोहनलाल लोढा पतसंस्था व ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेच्या वतीने तसेच पहूर पेठ ग्रामपंचायतीतर्फे जवानांचा सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पहूर पोलीस स्टेशनचे पीएसआय किरण बर्गे हे होते. कार्यक्रमाचे प्रास्तविक राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुका युवा अध्यक्ष शैलेश पाटील यांनी केले. भारतीय सेनेत निवड झालेले इम्रान अब्दुल रहिम पिंजारी (आसाम रायफल ) ,शकुर कुदबुद्दिन तडवी ( सी आय एस एफ ), शाहरूक युनूस तडवी ( आसाम रायफल ), गजानन प्रभाकर पांढरे ( आसाम रायफल ), शरद सुकलाल भोई (बी एस एफ ),प्रमोद अशोक सोनार ( सी आय एस एफ ), अतुल सुरेश पाटील ( एस एस बी ) या सात जवानांचा त्यांच्या पालकांसह मान्यवरांच्या हस्ते शाल श्रीफळ व पूष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मान्यवरांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर मनोगत व्यक्त केले. कृषी पंडित पतसंस्थेचे मार्गदर्शक प्रदिप लोढा यांनी तरूणांनी व्यसनांपासून दुर रहावे व स्पर्धा परीक्षांच्या माध्यमातून जिद्द आणि चिकाटीने यश संपादन करून वेगवेगळ्या क्षेत्रात देश सेवेसाठी तत्पर राहण्याचे आवाहन केले.
यासाठी लवकरच पतसंस्थेच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी नविन अद्ययावत अभ्यासिका वर्गाचे बांधकाम करणार असल्याचे जाहिर केले. यावेळी ईश्वर बाबुजी जैन पतसंस्थेचे चेअरमन भास्कर पाटील , कृषी पंडित पतसंस्थेचे चेआरमन बाबुराव पांढरे , पीएसआय अमोल देवढे, उपसरपंच शामराव सावळे, रविंद्र मोरे, तुळशीराम पाटील , सुकलाल बारी, मधुकर पवार , जेष्ठ पत्रकार शांताराम लाठे ,ज्ञानदेव करवंदे , शिवराज देशमुख ,अशोक सुरवाडे, ईश्वर बारी, गयास तडवी, आशीष माळी यांच्यासह गावातील स्पर्धा परिक्षेची तयारी कराणारे विद्यार्थी, ग्रामस्थ, पतसंस्थेचे कर्मचारी वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन शैलेश पाटील यांनी तर आभार शरद पांढरे यांनी मानले.
पहूर पेठ ग्रामपंचायत आयोजित कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी अॅड. संजय पाटील हे होते. यावेळी सरपंच निताताई रामेश्वर पाटील, उपसरपंच शाम सावळे, माजी जि. प. कृषी सभापती प्रदिप लोढा, सरपंचपती रामेश्वर पाटील, माजी जि प सदस्य राजधर पांढरे, अशोक पाटील, राजू पाटील, रविंद्र मोरे यांचेसह ग्रामपंचायत सदस्यांनी निवड झालेल्या जवानांचा व त्यांच्या परिवारांचा सत्कार करण्यात आला.