पहूर येथील संतप्त शेतकऱ्यांचा विज पुरवठा सुरळीत न झाल्यास तिव्र अंदोलनाचा इशारा

पहूर, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | पहूर मधील काही परिसरातील शेतांमध्ये अनियमित वीज पुरवठा होत असून तो सुरळीत करण्यात यावा अशी मागणी शेतकऱ्यांनी महावितरणचे कनिष्ठ अभियंता यांना निवेदनाद्वारे केली आहे.

 

निवेदनाचा आशय असा की, पहूर मधील काही शिवारातील शेतांमध्ये विद्युत पुरवठा हा कमी प्रमाणात असल्यामुळे शेतातील विहिरीतल्या पाणबुडी मोटर चालत नाही. त्यामुळे पिकांना पाणी मिळत नाही पिक खराब होण्याची दाट शक्यता आहे. म्हणून विद्युत पुरवठा सुरळीत करण्यात यावा. गेल्या काही दिवसांपासून शेतात होल्टेज कमी असल्याने वारंवार मोटारी व डीपी जळण्याचे प्रमाण वाढले आहे. आधीच शेतकरी आर्थिक संकटात असतांना गेल्या महिनाभरात तब्बल पाच ते सहा वेळेस डीपी जाळल्याने शेतकऱ्यांनी स्वतः पैसे खर्च करून डीपी बदलवून आणली आहे. जर लवकरात लवकर विद्युत पुरवठा सुरळीत न झाल्यास सर्व शेतकर्‍यांच्या वतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा निवेदनात देण्यात आला आहे. याप्रसंगी पहुर पेठचे रामेश्वर पाटील,माजी जि.प.सदस्य राजधर पांढरे,रोजगार हमी सदस्य किरण पाटील,शैलेश पाटील,योगेश भडांगे,वासुदेव घोंगडे तालुका शिवसेना प्रवक्ता तथा पत्रकार,गणेश पांढरे,अमोल पांढरे,वसंता कुमावत,जितेंद्र कुमावत, वीरेंद्र खुणावत, गोपाल देशमुख,चरण पाटील,ज्ञानेश्वर पांढरे,सागर थोरात,संदीप पांढरे,बाळू देशमुख,सचिन कुमावत,प्रदीप घोलप,सागर कुमावत यांच्यासह गावातील असंख्य शेतकरी सर्वपक्षीय नेते उपस्थित होते.

Protected Content