पहूर ता.जामनेर (प्रतिनिधी)। पहूर येथील बहिण-भावाची आयआयएम मॅनेजमेंट संस्थांमध्ये प्रवेशासाठी निवड झाली आहे. दोघांचे पहूर गावातील नागरिकांच्या वतीने कौतूक व शुभेच्छा देण्यात येत आहे.
जळगावातील आर.आर.विद्यालयाचे शिक्षक टी.बी.पांढरे यांची पुतणी दिव्या विजय पांढरे हीची आयआयएम संस्थेत प्रवेशासाठी निवड तर तीचा भाऊ संकेत विजय पांढरे यांचाही आयआयएम अहमदाबाद संस्थेच्या मॅनेजमेंट संस्थेत प्रवेश निश्चित झालेला आहे.
दिव्या आणि संकेत हे आयआयएम संस्थेत प्रवेश घेणारे पहूर येथील धनगर समाजातील पहिलेच विद्यार्थी ठरले आहेत. वडील वैद्यकिय प्रतिनिधी विजय बाबुराव पांढरे, प्रीती विजय पांढरे यांचे पाल्य तर स्वाती तुळशीराम पांढरे, न.वा.मुलींचे ज्युनियर कॉलेज यांचे पुतणे आहेत. त्यांनी संपादित केलेल्या देदीप्यमान यशाबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.