जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर तालुक्यातील पहूर येथील ज्वेलर्स दुकान फोडून ४५ हजार रूपये किंमतीचा मुद्देमाल लांबविणाऱ्या तीन संशयित आरोपींना जळगाव स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने मंगळवारी १४ फेब्रुवारी रोजी दुपारी १२ वाजता अटक केली आहे. तिघांना पुढील कारवाईसाठी पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील पहुर पोलीस ठाण्यात ९ फेब्रुवारी रोजी ज्वेलर्स दुकान फोडून चोरी केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना शोध घेण्यासंदर्भात जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी कारवाईच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार जळगाव स्थानिक गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील यांनी पथकाला कारवाईच्या सूचना दिल्या. या पथकात अधिनस्त पोलीस उपनिरीक्षक अमोल देवढे, पोलीस हेडकॉन्स्टेबल विजयसिंह पाटील, संदीप पाटील, अशरफ निजामुद्दीन, सुधाकर अंभोरे, सुनील दामोदरे, पोलीस नाईक प्रवीण मांडोळे, रवींद्र पाटील, अविनाश देवरे, पोलीस कॉन्स्टेबल दीपककुमार शिंदे, प्रमोद ठाकूर असे पथक तयार करून रवाना केले. पथकाने धरणगाव शहरातून संशयित आरोपी गजानन सोपान शिंगाडे (वय-३२) रा. वडगाव ता.जि.जालना, कतारसिंग गुरुकसिंग जुनी (वय-१९) आणि बलदेवसिंग बापूसिंग जुनी (वय-२२) दोन्ही रा. रा. धरणगाव या तीन जणांना अटक केली. तिघांनी पहूर येथील ज्वेलर्स दुकाना फोडल्याची कबुली दिली. पुढील कारवाईसाठी तिघांना पहूर पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.