पहूर, ता.जामनेर (प्रतिनिधी )। पहूर येथील आर.टी.लेले. हायस्कूल व महावीर पब्लीक स्कूल या कोविड केअर सेंटरला प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी भेट देवू पाहणी केली. यावेळी अत्यावश्यक सेवेची माहितींचा आढावा घेतला आहे.
पहूर येथील आर.टी.लेले हायस्कूल व महावीर पब्लीक स्कूलमधील कोरोना केअर सेंटरला आज सकाळी ११ वाजेच्या सुमारास प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी अनेक सुचना दिल्या. त्यात महावीर पब्लिक स्कूल येथील कोवीड सेंटरमध्ये नाचणखेडा येथील १२ जणांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले असले तरी या कोविड सेंटरमध्ये कुठेही सोशल डिस्ट्रिंगशनचे पालन होतांना दिसून आले नाही. विलगीकरण केलेले अनेक जण एकाच ठिकाणी आढळून आले. तसेच कोवीड सेंटरला दररोज सॅनिटायझेशन होणे गरजेचे असल्याचे सांगून एक नर्स आवश्यक आहे. कोवीड सेंटरमध्ये स्वच्छता ठेवणे, समोर लाईटची व्यवस्था करणे, या कोविड सेंटरमधील असुवीधेमुळे नाराजी व्यक्त केली.
यांची होती उपस्थिती
याप्रसंगी गटविकास अधिकारी एकनाथ लोखंडे, मंडळाधिकारी प्रशांत निंबोळकर, पहूरचे तलाठी सुनील राठोड, माजी पं.स.सभापती बाबुराव घोंगडे, पहूरपेठ सरपंचपती रामेश्वर पाटील, पहूर कसबे सरंपचपती शंकर घोंगडे, कोतवाल भानुदास वानखेडे, ग्रामविकास अधिकारी म्हस्के यांच्यासह ग्रामपंचायत कर्मचारी, पत्रकार बांधव उपस्थित होते. यावेळी कोवीड सेंटरवर दिल्या जाणाऱ्या सुविधांमध्ये तात्काळ बदल करावा असा आदेश उपस्थित अधिकारी व पदाधिकारी यांना प्रांताधिकारी दिपमाला चौरे यांनी दिला.