पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । आजवर कोरोनाच्या संसर्गाला थोपवून धरलेल्या पहूर कसबे गावात अखेर या विषाणूने शिरकाव केला असून येथील एक रूग्ण पॉझिटीव्ह आला असल्याने प्रशासनाने त्याचा रहिवास असणारा परिसर सील करण्याचा निर्णय घेतला आहे.
आतापर्यंत पहूर कसबे गाव हे कोरोना मुक्त होते. मात्र आता पहूर कसबे गावातही कोरोनाचा शिरकाव झाला असून एक जणाचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे नोडल अधिकारी तथा वैद्यकीय अधीक्षक डॉ.हर्षल चांदा यांनी सांगितले आहे. दरम्यान, पहूर कसबे येथील बाधित रूग्णाचा रहिवास असणारा परिसर प्रतिबंधित करण्यात आला आहे. पहूर ग्रामीण रुग्णालय येथिल वैद्यकिय अधिकारी डॉ.नारखेडे, डॉ.जितेंद्र वानखेडे, वाकोद प्राथमिक केंद्राचे वैद्यकिय अधिकारी डॉ.जितेंद्र जाधव व ग्रामीण रुग्णालय पहुर चे कर्मचारी ललित केवट, देवेंद्र घोंगडे तसेच इतर ग्रामपंचायत कर्मचारी उपस्थित होते.