पहूर, ता. जामनेर प्रतिनिधी । जळगावच्या कोविड रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या पहूर कसबे येथील त्या तरुणावर आज दुपारी तीनच्या सुमारास शोकाकूल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.
आज सकाळी जळगाव सामान्य रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले. त्यांचा मृतदेह घरी न आणता थेट स्मशानभूमीत नेण्यात आला. शासकीय नियमानुसार फिजीकल डिस्टंसिंगचे पालन करत अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी त्यांच्या दोघ चिमुकल्या मुलांसह पत्नी, आईने एकच हंबरडा फोडला . हे ह्रदयद्रावक दृष्य पाहून उपस्थितांची मनं हेलावून गेली. सर्वांच्या सुख : दुःखात सहभागी होणार्या या तरूणाच्या अकाली निधनाने गावात हळहळ व्यक्त होत आहे. या तरुणाला श्वास घेण्याचा त्रास जाणवत होता .परंतू त्यास कोरोना सदृश्य लक्षण दिसत नव्हती. खबरदारी म्हणून त्याचे स्वॅब घेण्यात आले आहेत.