Home आरोग्य पहूरच्या तरूणाचा कोविड रूग्णालयात मृत्यू

पहूरच्या तरूणाचा कोविड रूग्णालयात मृत्यू

0
32

पहूर ता जामनेर प्रतिनिधी । पहूर कसबे गावातील एका तरुणाचा जळगाव कोवीड रूग्णालयात उपचारादरम्यान बुधावारी संध्याकाळी मृत्यू झाल्याने गावात भितीचे वातावरण पसरले आहे. तथापि, या तरूणाला कोराना सदृश्य लक्षणे नसल्याची माहिती वैद्यकीय अधिकार्‍यांनी दिली आहे.

याबाबत वृत्त असे की, पहूर कसबेतील तरूणाला श्‍वसनाचा त्रास होत असल्याने पहूर ग्रामीण रुग्णालयातून गोदावरीतील जिल्हा सामान्य रुग्णालयात रवाना करण्यात आले. तेथे व्हेंटिलेटर नाही म्हणून तरूणाला कोवीड रुग्णालयात जाण्याचा सल्ला दिला. त्यानुसार त्याला कोवीड रूग्णालयात दाखल केले. आज सायंकाळी उपचारा दरम्यान त्याचा मृत्यू झाला आहे. मात्र या तरुणाला कोरोणा सदृश्य लक्षणे नसून त्याचे खबदारीसाठी शवविच्छेदन करण्यात येणार असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्या वतीने वैद्यकीय अधिक्षक डॉ. हर्षल चांदा यांनी दिली आहे. या तरूणाचे स्वँब घेतले आहे किंवा नाही याची माहिती आरोग्य विभागाने दिली नाही. तथापि, पहूरकरांना नागरिकांनी घाबरून जावू नये व कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे आवाहन आरोग्य खात्यातर्फे करण्यात आले आहे.


Protected Content

Play sound