जळगाव प्रतिनिधी । शहरातील लाडवंजारी कार्यालयातून एका महिलेची एक लाख 6 हजार 508 रुपयांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची घटना 28 नोव्हेंबर रोजी घडली होती. रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल या गुन्ह्यात पोलिसांनी मध्यप्रदेशातील दोन मुलांना ताब्यात घेतले आहे.
अल्पवयीन असलेल्या एकाची बालसुधारगृहात आली आहे. तर दुसरा अभिषेक अमरसिंग चंदेल वय 20 रा. हुलखेडी जि.राजगड (मध्यप्रदेश) यास अटक शुक्रवारी न्यायालयात हजर करण्यात आले. न्यायालयाने त्याच पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. वयात असतांनाही अमरसिंग याने अल्पवयीन असल्याची खोटी माहिती पोलिसांना दिली होती. पोलिसांनी प्रत्यक्षात खात्री करुन त्यास अटक केल्याची माहिती मिळाली आहे.
एरंडोल शहरातील रहिवासी प्रसिध्द कवी वा.ना.आंधळे यांची पत्नी रत्नप्रभा वासुदेव आंधळे वय 50 रा. एरंडोल यांच्या लहान मुलीचे 28 नोव्हेंबर रोजी शहरातील लाडवंजारी मंगल कार्यालयात लग्न होत. या लग्नात जेवणादरम्यान त्यांची 46 हजार 580 रुपये रोख, व 60 हजारांचे दागिणे असा 1 लाख 6 हजार 580 रुपयांचा ऐवज असलेली पर्स लांबविल्याची घटना घडली होती. या घटनेत पर्स लांबविणारे दोघेही चोरटे सीसीटीव्ही कॅमेर्यात कैद झाले होते. याप्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. हे फुटेज पोलिसांनी सोशल मिडीयावर व्हायरल केले होते.
याचदरम्यान चोरीच्या घटनेत एमआयडीसी पोलिसांनी दोन अल्पवयीन मुलांना ताब्यात घेतले होते. दोघांनी आम्ही मध्यप्रदेशातील असून रस्ता चुकल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांच्या चौकशीत चोरी केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांची बालसुधारगृहात रवानगी करण्यात आली होती.
रामानंदनगर पोलीस ठाण्यात दाखल गुन्ह्याचे तपासअधिकारी पोलीस नाईक रविंद्र पाटील यांना एमआयडीसी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या अल्पवयीन मुलांबाबत माहिती मिळाली. त्यांनी सीसीटीव्हीचे फुटेजमधील वर्णनानुसार दोघांची खात्री केली असता, पर्स लांबविणारे दोघे असल्याचे निष्पन्न झाले. त्यातील अभिषेक चंदेल याने अल्पवयी न असल्याची माहिती दिली होती. मात्र पोलिसांनी आधारकार्ड मागवून त्याची खात्री केली व त्यावरुन त्यास अटक करुन जिल्हा न्यायालयात हजर केले. न्यायालयाने त्यास पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. सरकारपक्षातर्फे अॅड. स्वाती निकम यांनी काम पाहिले.