जळगाव प्रतिनिधी । पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्थेच्या जिल्हा युवा अध्यक्षपदी वराड सीम येथील लखन संजय सजोले यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती राष्ट्रीय अध्यक्ष देवा तांबे, उपाध्यक्षा संगीता पाध्ये व सचिव सौरभ हजारे यांनी केली आहे.
लखन सजोले यांनी विभागात केलेल्या पर्यावरणीय कार्याची दखल घेऊन तसेच पर्यावरण मित्र बहुउद्देशीय संस्था भारत अंतर्गत पर्यावरण मित्र या नात्याने पर्यावरा रक्षण व समाजकार्याचे निस्वार्थ व प्रामणिक कार्य करावे तसेच आपल्या भविष्यातील पर्यावरणीय वाटचालीस संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आले आहे. जळगाव जिल्हा युवाध्यक्ष लखन सजोल यांची नियुक्ती झाल्याने सर्व क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे.