परिवहन मंत्री अनिल परब यांना ईडीचे चौकशीसाठी समन्स

मुंबई | राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांना अंमलबजावणी संचलनालय अर्थात ईडीने २८ नोव्हेंबर रोजी चौकशीसाठी उपस्थित रहावे असे समन्स बजावले आहे.

 

 

अनिल परब यांना याआधी ३१ ऑगस्ट रोजी समन्स पाठवण्यात आलं होतं. मात्र त्यावेळी त्यांनी नियोजित कार्यक्रमांचं कारण देत जबाब नोंदवण्यासाठी वेळ देण्याची मागणी केली होती. मात्र आता ईडीने पुन्हा एकदा समन्स बजावले आहे. यात परब यांना येत्या २८ सप्टेंबरला ईडी कार्यालयात हजर राहून जबाब नोंदवण्यास बजावलं आहे.

 

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील मंत्री आणि मान्यवर नेत्यांच्या मागे ईडी चौकशीचा ससेमिरा लागला असतांनाच आता पुन्हा एका मंत्र्याला ईडीने समन्स बजावल्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Protected Content