मुंबई प्रतिनिधी | तत्कालीन गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील आरोपांमुळे चर्चेत आलेले मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीरसिंग यांच्यासह आठ जणांवरविरूध्द खंडणीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
. परमबीर सिंह यांच्याविरुद्ध खंडणी मागितल्याप्रकरणी गुन्हा दाखल झाला आहे. एका बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीनंतर मुंबईतील मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्यासह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून, यात ६ पोलीस कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. आपल्याविरुद्ध दाखल असलेल्या तक्रारी निकाली काढण्यासाठी १५ कोटी रुपयांची खंडणी मागण्यात आली होती, असा आरोप या व्यावसायिकाने तक्रारीत केला आहे. पोलिसांनी परमबीर सिंह यांच्यासह आठ जणांविरुद्ध भादंवि कलम ३८७, ३८८, ३८९, ४०३, ४०९, ४२०, ४२३, ४६४, ४६७, ४६५, ४६८, ४७१, १२० (ब), १६६, १७७, १८१, १८२, १९३, १९५, २०३, २११, २०९, २१०, ३४७, १०९, ११०, १११, ११३ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
ठाण्यातील एका बांधकाम व्यावसायिकाने परमबीर सिंह यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. श्यामसुंदर अग्रवाल नावाच्या बांधकाम व्यावसायिकाने दिलेल्या तक्रारीवरून मरीन ड्राइव्ह पोलीस ठाण्यात परमबीर सिंह यांच्याह ८ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एफआयआरमध्ये आठ जणांची नावं आहेत. त्यात परमबीर सिंह यांच्यासह इतर सहा पोलिसांचाही समावेश आहे. या प्रकरणात दोघांना अटक करण्यात आली आहे.