पतीसोबत झालेल्या भांडणानंतर विवाहितेची आत्महत्या

नवी दिल्ली (वृत्तसंस्था) पतीसोबत झालेल्या भांडणानंतर एका विवाहितेने आपल्या तीन मुलांसह ट्रेनसमोर उडी मारून आत्महत्या केली. दुर्दैवाने २ चिमुकल्यांचा मृत्यू झाला तर १ वर्षाचे थोडक्यात बाळ बचावले. दिल्लीच्या मंडावली स्थानक परिसरात घडलेल्या या घटनेने प्रचंड खळबळ उडाली आहे.

 

रात्री साडेतीनच्या सुमारास हा प्रकार घडला. मृत महिलेचे नाव किरण असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. तसेच, ही महिला रेल्वे कॉलनीमध्ये राहत असून, पतीसोबत भांडण झाले म्हणून आत्महत्या केल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. मृत महिलेसह मृत २ मुलींचे वय ५ आणि ६ वर्ष आहे. तसेच थोडक्यात बचावलेले मुलं हे एका वर्षाचे होते. विशेष म्हणजे लहान बाळ जखमी झालेल्या शरीरापाशी बसलेले होते.

Protected Content