जळगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी– मी सुरुवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेस आणि त्यांचे अध्यक्ष शरद पवार यांच्या विषयी विरोधाची भूमिका होती, पण राष्ट्रवादीचे अध्यक्ष पवार यांनीच त्यांच्या विश्वासू व्यक्तीला पाणीपुरवठा स्वच्छता आणि पाणीपुरवठा मंत्रीपद देण्याऐवजी मला पालकमंत्री आणि ग्रामीण पाणीपुरवठा स्वच्छता दिले, असे मनापासून शरद पवारांचे कौतुक करीत मनोगत व्यक्त केले.
चांदसर येथील स्वातंत्र्य सेनांनी तथा माजी आ. कै. मुरलीधर गंगाराम पवार यांच्या पुतळ्याचे अनावरण राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील बोलत होते. दरम्यान राजकारणात आता कोणी पहिलवान नाही, असे नेहमीच माजी मुख्यमंत्री आणि आताचे विरोधीपक्ष नेते फडणवीस बोलत, परन्तु दूरदृष्टी असलेल्या राष्ट्रवादीच्या शरद पवारांनी हे सर्व चित्र क्षणात बदलवल्याचे माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी देखील यावेळी बोलतांना सांगितले.
यावेळी व्यासपीठावर गृहमंत्री जयंत पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष अड्.रवींद्र पाटील, यांच्यासह राष्ट्रवादी कॉंग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.