यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल शहरातील श्री मनुदेवी आदिवासी विद्या प्रसारक मंडळ संचालीत सरदार वल्लभभाई पटेल स्कूल मध्ये हळदी कुंकवाचा कार्यक्रम साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी म्हणून सारिका पाटील, निर्मला महाजन, मंगला फेगडे, सरस्वती विद्यामंदिर शाळेचे नरेंद्र महाले इत्यादी उपस्थित होते. सर्वात प्रथम प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सरस्वती पूजन करून दीपप्रज्ज्वलन करण्यात आले. शाळेच्या मुख्याध्यापिका शिला तायडे यांनी प्रमुख पाहुण्यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केले.
नरेंद्र महाले यांनी मुलगी व आई या नात्यावर अत्यंत सुंदर असे भाषण करून सर्व महिला वर्गांना सुंदर अशी मार्गदर्शनपर माहिती दिली. त्यानंतर हळदी कुंकवाच्या कार्यक्रमाला सुरुवात झाली. हळदी कुंकवामध्ये महिला वर्गांचे उखाणे तसेच विविध स्पर्धा घेण्यात आल्या तसेच वाण देण्यात आले. राजेंद्र महाजन व निर्मला महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली तसेच प्रशांत फेगडे व सर्व शिक्षक वर्ग व कर्मचारी वर्ग यांच्या सहकार्याने हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात महिला वर्गाची चांगली उपस्थिती होती. संपूर्ण कार्यक्रमाचे सूत्रसंचालन टिना निंबाळे, कुंदा नारखेडे व अर्चना चौधरी यांनी केले. अशा प्रकारे उत्साहाच्या व आनंदाच्या वातावरणात हळदी कुंकवाचा हा कार्यक्रम पार पडला .
पटेल इंग्लीश स्कूल मध्ये महिलांचा हळदी कुंकवाचा कार्यक्रम
12 months ago
No Comments