मुंबई : वृत्तसंस्था । शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते माझ्या राजीनाम्याबद्दल निर्णय घेतील असे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे .
बलात्काराच्या गंभीर आरोपांनंतर एकीकडे विरोधक राजीनाम्याची मागणी करत असताना राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे पक्ष कार्यालयात पोहोचले आहेत. पक्ष कार्यालयात अजित पवार, जयंत पाटील आणि प्रफुल्ल पटेल यांच्यातील बैठक पार पडल्यानंतर धनंजय मुंडे पोहोचले आहेत. यावेळी त्यांनी आरोपांनंतर पहिल्यांदाच प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.
धनंजय मुंडे यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितलं की, “मी स्वत: शरद पवारांकडे स्पष्टीकरण दिलं आहे. बुधवारी सकाळीच मी त्यांची वेळ घेतली आणि भेटून सविस्तर माहिती दिलेली आहे. आणि माझं व्यक्तीगत जे म्हणणं आहे ते मी प्रेसनोटच्या माध्यमातून प्रसारमाध्यांना दिलं आहे”. धनंजय मुंडे यांना राजीनाम्यासंबंधी विचारण्यात आलं असता ते म्हणाले की, “याबाबत शरद पवार आणि पक्षातील मोठे नेते विचार करतील आणि त्याबाबत निर्णय होईल”.