जळगाव, प्रतिनिधी । भाजपा मंडल क्र १ ची पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ७० व्या वाढदिवसानिमित्त व पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त मंडलात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार असून याबाबतची बैठक सोमवार १४ सप्टेंबर रोजी मंडल अध्यक्ष रमेश जोगी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली.
सेवा सप्ताह या विषयावर शिवाजी नगर परिसर मध्ये सोशल डिस्टन्सिंग नियमांचे पालन करत बैठक घेण्यात आली. बैठकीला भाजपा जळगाव जिल्हा महानगराध्यक्ष दिपक सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हा सरचिटणीस, महेश जोशी, नितीन इंगळे, जितेंद्र मराठे यांनी मार्गदर्शन केले. यात दि. १७ ते २५ पर्यंत वृक्षारोपण करणे, रक्तदान करणे, स्वच्छता अभियान राबवणे, मास्क वाटप करणे आदी कार्यक्रम मंडळात घेण्यात येणार असल्याचे सांगितले. त्याचबरोबर महापालिकेतर्फे लवकरच २०० कोटींचे रस्ते होणार आहेत असे सांगितले. याप्रसंगी नगरसेवक राजू मराठे , नगरसेवक नवनाथ दारकुंडे, नगरसेवक दिलीप पोकळे व सरचिटणीस शांताराम गावंडे, सरचिटणीस संजय शिंपी, युवा मोर्चा अध्यक्ष दिनेश पुरोहित, महिला आघाडी अध्यक्ष ज्योती राजपुत, ओबीसी आघाडी अध्यक्ष लता बाविस्कर मंडळातील कार्यकर्ते प्रभाकर तायडे, सुशील भावसार, राजू मांढरे, संजय सोनवणे, संजय अकोलकर कार्यकर्ते उपस्थित होते. आभार प्र संजु शिंपी यांनी केले