संत व महापुरूषांची बदनामी थांबवा- तेली समाजातर्फे निवेदन

चोपडा प्रतिनिधी । काही व्यावसायिक संत व महापुरूषांची बदनामी करत असून समाज याला सहन करून घेणार नसल्याचे निवेदन येथील तेली समाज बांधवांतर्फे तहसीलदारांना दिले आहे.

चोपडा तेली समाजाची संस्था श्री संताजी जगनाडे समस्त तेली समाज, चोपडा तर्फे तहसीलदार, चोपडा यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात म्हटले आहे की, श्री संताजी जगनाडे महाराज हे तेली समाजाचे आराध्य दैवत आहे. जालना येथील ऊबाळे कंपनीच्या बीडी बंडलवर संताजी नाव टाकल्याने तेली समाजात संतापाची लाट उसळली आहे. ऊबाळे कंपनीच्या मालकाचा तीव्र धिक्कार आणि निषेध करण्यात येऊन कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनात पुढे म्हटले आहे की, संतांच्या व महापुरुषांच्या नावाचा दुरूपयोग करणारे उद्योजक जसे बिअर बार, दारू शॉपी , तंबाकू ऊत्पादने यांचेवर बंदी आणून कायदेशीर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे. संताच्या व महापुरुषांच्या नावाचा दुरूपयोग सहन केला जाणार नाही अन्यथा लोक क्षोभाला सामोरे जावे लागेल असा इशारा यात देण्यात आला आहे.

या निवेदनावर अध्यक्ष के. डी. चौधरी, सचिव बी. के. चौधरी, सहसचिव प्रशांत सुभाष चौधरी, नंदलाल ताराचंद चौधरी, ज्ञानेश्‍वर आनंदा चौधरी, ज्ञानेश्‍वर महारू चौधरी, छोटू राघो चौधरी, ज्ञानदीप साहेबराव चौधरी, राजेंद्र निंबा चौधरी, विनोद लोटन चौधरी, सुरेश एम. चौधरी, लक्ष्मण बंडू चौधरी, नारायण पंडित चौधरी, शरद रामदास चौधरी, रमेश हिरालाल चौधरी, श्रीराम लालचंद चौधरी यांचेसह समाज बांधवांच्या सह्या केल्या आहेत. संबंधीत निवेदन शासनाकडे पाठविण्यात यावे असे के. डी. चौधरी यांनी सांगितले. तहसीलदारांच्या वतीने नायब तहसीलदार श्री पौळ यांनी स्वीकारून शासनाकडे सादर करण्यात येईल असे सांगितले.

Protected Content