पुणे – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज वृत्तसेवा – महानगर पालिकांच्या निवडणूक पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी ६ मार्च रोजी पुणे दौऱ्यावर येत आहेत. पंतप्रधानांच्या दौऱ्यात पुण्याचे पालकमंत्री म्हणून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सर्वपक्षीय नेते पदाधिकारी सहभागी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे.
रविवार ६ मार्च रोजीच्या पुणे दौऱ्यात पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते मेट्रो, नदीकाठ सुधार प्रकल्प, पंतप्रधान आवास योजनेचे उद्घाटन, पीएमपीएमएलच्या इ-बसचे लोकार्पण यासह आर.के.लक्ष्मण आर्ट गॅलरी, पुणे महानगरपालीकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्मारकाचे उद्घाटन आदी कार्यक्रम मनपा निवडणूक निमित्ताने आयोजित आहेत. या कार्यक्रमास महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी देखील पंतप्रधानांच्या दौऱ्यात सहभागी व्हावे अशी विनंती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे.