पंतप्रधान काळाराम मंदिरात जाणार

नाशिक-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | पंतप्रधान नरेंद्र मोदी हे येत्या शुक्रवारी (ता. १२) राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या उद्ध‌घाटनासाठी नाशिकला येत आहे.

या दौऱ्यादरम्यान पंतप्रधान मोदी हे पंचवटीतील सुप्रसिद्ध श्री काळाराम मंदिरात दर्शनासाठी जाणार असल्याचे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते काळाराम मंदिरात महाआरतीही केली जाणार आहे. राष्ट्रीय युवा महोत्सवासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. पंचवटीतील श्री काळाराम मंदिर प्रसिद्ध आहे.

पंतप्रधान मोदी हे या मंदिरात दर्शनासाठी जाणार असून, यावेळी त्यांच्या हस्ते आरतीही केली जाणार आहे. २२ जानेवारी रोजी अयोध्येत रामलल्ला मूर्ती प्राणप्रतिष्ठा सोहळा होत आहे.
त्यामुळे पंचवटीतील काळाराम मंदिरालाही महत्त्व प्राप्त झाले आहे. पंतप्रधान मोदी हे निलगिरी बाग येथे हेलिकॉप्टरमधून पोहोचतील. त्यानंतर ते औरंगाबाद रोडने रोड शो करीत तपोवनातील कार्यक्रमस्थळापर्यंत पोहोचणार आहेत.

युवा महोत्सवाचे उद्धघाटन झाल्यानंतर पंतप्रधान मोदी हे मोटारीने पंचवटीतील श्री काळाराम मंदिरात जातील, असे विश्वसनीय सूत्रांकडून समजते.

Protected Content