नवी दिल्ली वृत्तसंस्था । पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जनता कर्फ्यूच्या दरम्यान पाच वाजता थाळीनाद व टाळ्या वाजवून कोरोनाशी प्रतिकार करण्यासाठी मदत करणार्यांप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याच्या आवाहनाला देशभरातून जोरदार प्रतिसाद लाभला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. याला देशवासियांनी जोरदार प्रतिसाद दिला. यासोबत त्यांनी सायंकाळी पाच वाजता कोरोनाशी लढण्यात मदत करणार्यांसाठी अभिवादन व कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. यालाही देशवासियांनी उत्स्फुर्त प्रतिसाद दिल्याचे दिसून आले. अगदी लहान गावांपासून ते महानगरांपर्यंत लोकांनी थाळीनाद आणि टाळ्यांचा कडकडाट करून कृतज्ञता व्यक्त केली.