कासोद्यात कोरोनो संसर्ग टाळण्यासाठी जनतेचा उत्स्फूर्त सहभाग

कासोदा प्रतिनिधी । संपूर्ण देशात आज जनता कर्फ्यू लागू करण्यात आला होता. याला कासोदावासीयांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. तर सायंकाळी ५ वाजेच्या सुमारास थाळीनाद केला.

अत्यावश्यक सेवा वगळता सर्व कार्यालये दुकाने बाजारपेठा पूर्णपणे बंद होत्या. ग्रामीण भागातील लोकांनी घराबाहेर पडण्याचे टाळले. दिवसभर आपल्या परिवाराबरोबर एकत्र राहण्याचा आनंद वेगळाच होता. असे परीवारातील काही सदस्यांनी बोलून दाखवले. रविवारी सकाळी ७ वाजल्यापासून तर रात्री ९ वाजेपर्यंत जनतेचे संचारबंदी स्वयंपूर्णता असेल, असे पंतप्रधानांनी सांगितले होते. परंतु याला जनतेने उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. विषाणूचा संसर्ग एकमेकांच्या जवळ जाण्याने होत असल्यामुळेच लोकांनी गर्दी करू नये एकमेकांच्या जवळ जाऊ नये आणि घरीच थांबावे यासाठी पंतप्रधानांनी जनता कर्प्युची कल्पना मांडली होती.

कोरोना विरोधात लढणाऱ्या आरोग्य कर्मचारी, प्रशासकीय यंत्रणा, पोलिस प्रशासन आणि महाराष्ट्र शासन, केंद्र शासनाच्या प्रयत्नांचे कौतुक घरोघर थाळी नाद, टाळी नाद करून करण्यात आले. शहरात संध्याकाळी ५ वाजता एकच नाद ऐकू येत होता. अनेकांनी शासन, प्रशासन, अधिकारी, पत्रकार पोलिस पाटील कर्मचारी यांचे मनापासून आभार व्यक्त केले. जनता कर्फ्यु नगरपरिषद व नगरपंचायत (नागरी भागात) क्षेत्रात कलम 144 लागू होणार आहे. जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या निर्देशानुसार. त्याअनुषंगाने तालुक्यातील सर्वे गावांमध्ये कोतवाल यांचे मार्फत दवंडी द्यावी. सर्वे तलाठी ग्रामसेवक पोलीस पाटील आशा वर्कर यांनी गावात प्रसिद्धी द्यावी तहसीलदार अर्चना खेतमाळीस एरंडोल यांनी आवाहन केले आहे.

नागरीकांनी कायद्याचे पालन करावे- पोलीस प्रशासन
जिल्हा पोलीस प्रशासनाच्या आदेशानुसार सपोनि रविंद्र जाधव यांनी नागरिकांना आव्हान केले आहे की, संपूर्ण महाराष्ट्रात कलम १४४ सुरू असून नागरिकांनी सहकार्य करावे या संसर्गजन्य आजारापासून दूर होण्यासाठी ३ फुटाचा अंतर ठेवून बोलणे व ५ पेक्षा अधिक नागरिकांनी जमाव करू नये असल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येणार असल्याचे सपोनि रवींद्र जाधव यांनी live trend news च्या प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले. याकामी सर्वांनी सहकार्य करावे.

 

jalgaon corona, jalgaon corona news, jalgaon coronavirus, corona in jalgaon, jalgaon corona cases, covid 19 jalgaon, jalgaon corona update, live trends jalgaon, live trends news jalgaon, jalgaon corona news today,
livetrends jalgaon, covid19 e pass jalgaon, jalgaon latest news

Protected Content