पंजाबमधील शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनमध्येही कार रॅली

साउथॉल: वृत्तसंस्था । नव्या कृषी कायद्याविरोधात पंजाबमध्ये सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी ब्रिटनमध्येही कार रॅली आयोजित करण्यात आली. मात्र, या आंदोलनाच्या आयोजकांवर पोलिसांनी दंड ठोठावला आहे.

या रॅलीमुळे वाहतूक कोंडीही झाली होती. त्यामुळे सामान्य नागरिकांना त्रास झाला. या रॅलीत कार, ट्रॅक्टर, टेम्पो आणि मोटरबाइक यांचा समावेश होता.

पंजाबसह भारतातील शेतकऱ्यांनी केंद्र सरकारच्या नव्या कृषी कायद्याला विरोध केला आहे. त्यासाठी आंदोलनेदेखील सुरू आहेत. या आंदोलनकर्त्या शेतकऱ्यांसोबत एकजूटता दाखवण्यासाठी ब्रिटीश शीख दीप सिंग यांनी साउथॉलमध्ये कार, ट्रॅक्टर, टेम्पो आणि मोटरबाइक रॅलीचे आयोजन केले होते. पोलिसांनी या रॅलीला ठोठावलेल्या दंडाबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. माझे वकील याविरोधात दाद मागणार असल्याचे त्यांनी सांगितले.

ही रॅली राजकीय नाही, त्याशिवाय कोरोनाच्या निर्देशाचेही पालन होत नसल्याचा आरोप त्यांनी लावला आणि दंड ठोठावला असल्याची माहिती त्यांनी दिली. भारतात शेतकरी आंदोलन करत आहेत, शेतकऱ्यांच्या आत्महत्या होत आहेत. मग त्याविरोधातील रॅली राजकीय कशी नाही, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

 

ब्रिटनमध्ये शीख समुदायाला त्रास दिला असल्याकडे त्यांनी निर्देश केला. वर्णद्वेषाविरोधात आंदोलन झाले. त्यांच्याकडूनही १० हजार पाउंडचा दंड वसूल केला नाही. पाकिस्तानी नागरिकांनी साउथॉलच्या रस्त्यांवर, गल्लीत ईद साजरी केली, त्यांनाही दंड करण्यात आला नाही. मात्र, शीख समुदायाला लक्ष्य करण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले.

शेतमालाला हमी भाव मिळावा यासाठी शेतकरी आंदोलन करत आहेत. शेतकऱ्यांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात आंदोलन सुरू आहे. अशा वेळी आम्ही त्यांना पाठिंबा देणे कर्तव्य समजत असल्याचे दीप सिंग यांनी म्हटले. नॅशनल शीख युथ फेडरेशनचे समशेर सिंग यांनी सांगितले की, आमच्या शीख मातृभूमीतील शेतकरी आणि कामगारांप्रति एकजूट व्यक्त करण्यासाठी रॅलीचे आयोजन केले आहे.

आंदोलनात खलिस्तानवाद्यांनीही सहभाग घेतला होता. यावेळी खलिस्तानच्या समर्थनात घोषणाबाजीही झाली. मागील काही वर्षांपासून खलिस्तानवादी चळवळ पुन्हा सक्रिय झाल्याचे चित्र आहे.

मेट्रोपॉलिटन पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, चार ऑक्टोबर रोजी साउथहॉलमध्ये झालेल्या आंदोलनानंतर हेल्थ प्रोटेक्शन रिलेशंन २०२० च्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी एका व्यक्तीवर १० हजार पाउंडचा दंड ठोठावण्यात आला आहे. कोरोना व्हायरस कायद्यातंर्गत आंदोलनास परवानगी दिली जात नाही. आयोजकांनी संसर्गाच्या जोखिमेचे मूल्यांकन करणे आवश्यक असून त्यादृष्टीने पावले उचलत खबरदारी घेण्याची आवश्यकता असल्याचे त्यांनी म्हटले. संसर्ग फैलावू नये याची काळजी घ्यावी असे त्यांनी म्हटले.

Protected Content