सावदा ता. रावेर प्रतिनिधी । विद्यार्थ्यांची ये-जा करण्याची गैरसोय होत असल्याने न्हावी-फैजपूर आणि सावदा-खिरोदा या मार्गावरील बसेस सुरू करावी या मागणीसाठी युवासेनेचे प्रसिध्दीप्रमुख अभय पाटील यांनी यावल आगारप्रमुखांना निवेदन पाठविले आहे.
अभय पाटील यांनी निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाचे नियम थोडे शिथिल झाल्याने शाळा, महाविद्यालये सुरू झाले आहे. काही खेड्यातून विद्यार्थ्यांना येण्या-जण्यासाठी बस नसल्याने त्यांची मोठी गैरसोय होत आहे. शाळा आणि महाविद्यालय येथे जाण्यासाठी विद्यार्थ्यांची गैरसोय होणार नाही, विद्यार्थी हिताची काळजी घेऊन लवकरच आपण बसेच सुरू कराव्या त्वरित सुरू करावी, यासाठी यावल आगार प्रमुख भालेराव यांना युवासेना सावदा शहर प्रसिद्धीप्रमुख अभय श्यामकांत पाटील यांनी केली आहे. दरम्यान लवकरात लवकर बसेस सुरू करण्याचे आश्वासन आगर प्रमुख भालेराव यांनी दिले आहे.