न्यायासाठी महिलेचा उपोषणाचा इशारा

 

भुसावळ, प्रतिनिधी । जागतिक महिला दिनी आर्दश फुलगांवमध्ये महिलेने गावगुंडांपासून कुंटुबासह रक्षणासाठी व न्यायासाठी ग्रामपंचायतीसमोर उपोषणाचा इशारा दिला आहे.  

आर्दश फुलगावमध्ये सराईत गावगुंड व बेकायदा दारू व हातभट्टी विकणारा उत्तम मधुकर चौधरी व त्याच्या मुलांवर कायमस्वरूपी प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी त्याची सून गीताबाई रोशन चौधरी हिने केली आहे. गीताबाई हिस त्यांनी जीवे ठार मारण्याची धमकी त्यांनी दिली आहे.  दारूचा व्यवसाय करणारा सासरा, सराईत व आडदांड, खुनशी पती, आणि सासु, देर यांच्या जाचांस कंटाळून स्थानिक पोलीस न्याय देत नसल्याचा आरोप गीताबाई हिने केला आहे. तसेच येत्या सोमवार आठ मार्च रोजी ‘जागतिक महीला दिनी’ सकाळी दहा ते पाच पीडित गीता रोशन चौधरी, तिची आई, बहीण, मुलगी त्यांना या गुंडांवर कायमस्वरूपी पोलीस कार्यवाही व्हावी व न्याय मिळावा म्हणून उपोषण करणार आहेत. 

 

 

Protected Content