मुंबई (वृत्तसंस्था) दिल्ली दंगलीसंदर्भातील याचिकेवर दिल्ली हायकोर्टात सुनावणी सुरू आहे. दिल्लीतील कायदा- सुव्यवस्था साफ कोसळली आहे. १९८४ च्या दंगलीसारखे भयंकर चित्र निर्माण होऊ नये अशी टिपणी न्या. मुरलीधर यांनी केली व पुढच्या २४ तासांत न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश राष्ट्रपती भवनातून निघाले. न्यायालयासही सत्य बोलण्याची शिक्षा मिळू लागली आहे काय? न्यायमूर्ती मुरलीधर यांनी चुकीचे काय सांगितले?,’ असा सवाल शिवसेनेने केला आहे.
दिल्ली दंगली संदर्भातील याचिकेवर सुनावणी करणारे उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मुरलीधर यांची तडकाफडकी बदली करण्याच्या निर्णयावरून शिवसेनेनं भाजपवर निशाणा साधला आहे. दिल्लीतील कायदा- सुव्यवस्था साफ कोसळली आहे. १९८४ च्या दंगलीसारखे भयंकर चित्र निर्माण होऊ नये अशी टिपणी न्या. मुरलीधर यांनी केली. न्या. मुरलीधर यांनी जनतेच्या मनातील उद्रेकास तोंड फोडले. सर्वच सामान्य नागरिकांना ‘झेड सुरक्षा’ देण्याची वेळ आली आहे, असे भाष्य न्या. मुरलीधर यांनी केले. त्यानंतरच्या २४ तासांत न्या. मुरलीधर यांच्या बदलीचे आदेश राष्ट्रपती भवनातून निघाले. याच मुद्द्यावरून शिवसेनेने केंद्र सरकारवर कडवट टीका केली आहे.