मुंबई (वृत्तसंस्था) भाजप नेत्यांच्या भडकाऊ भाषणावर कारवाई का केली नाही?, असा दिल्ली पोलिसांना प्रश्न विचारणारे दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आली आहे. ही दडपशाही बघून हिटलरने सुद्धा शरमेने मान घातली असती”, असा खोचक टोला राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाडांनी भाजपला लगावला आहे.
दिल्लीत उसळलेल्या हिंसाचारावरून दिल्ली पोलिसांना खडेबोल सुनावणारे दिल्ली उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. मुरलीधर यांची मध्यरात्री तडकाफडकी बदली करण्यात आली. दरम्यान, या बदलीविरोधात राष्ट्रवादीचे नेते आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधत दिल्ली हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश मुरलीधर यांना त्यांच्या कर्तव्याचे बक्षीस म्हणून त्यांची तडकाफडकी बदली करण्यात आल्याचे म्हटले आहे. दरम्यान, कॉंग्रेसने देखील भाजपवर टीका केली आहे.