नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू

 

ओस्लो ( नॉर्वे ) : वृत्तसंस्था । कोरोना लस घेतल्यानंतर नॉर्वेत २९ नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे. त्यामुळे नॉर्वे सरकारसमोर संकट उभं ठाकलं आहे.

नॉर्वेमध्ये कोरोना लसीकरणाला सुरूवात झाली असून, डिसेंबरच्या अखेरीपासून आतापर्यंत २५ हजाराहून अधिक लोकांना लस देण्यात आली आहे.

कोरोनाविरोधातील लढाई निर्णायक ठरणाऱ्या लस तयार करण्यात अनेक कंपन्यांना यश आलं आहे. अनेक देशांमध्ये लसींच्या आपत्कालीन वापरासाठीही परवानगी देण्यात आली असून, लसीकरण अभियानही सुरू करण्यात आलं आहे. याच दरम्यान, लसीकरण मोहीम राबवण्यात येत असलेल्या नॉर्वेत लस घेतल्यानंतर २९ जणांचा मृत्यू झाला आहे. फायझर बायोएनटेकची लस घेतल्यानंतर या घटना घडल्या आहेत.

फायझर बायोएटेकची लस घेतल्यानंतर अनेकांना त्रास सुरू झाल्याचं समोर आलं. यात २९ नागरिकांचा लसीकरणानंतर मृत्यू झाला आहे. तर ७५ पेक्षा अधिक नागरिकांची प्रकृती चिंताजनक आहे.

मृतांमध्ये ७५ ते ८० वयोगटातील वृद्ध नागरिकांचा समावेश आहे. बहुतांश मृत्यू हे गंभीर आजार असलेल्या नागरिकांचे झाले आहेत. लस घेतल्यानंतर या नागरिकांना उलटी, ताप यासारखा त्रास जाणवला होता. नॉर्वेमध्ये फायझर बायोएनटेक तयार केलेली लसच उपलब्ध झालेली आहे. लसीकरणानंतर झालेले मृत्यू या लसीशी संबंधितच आहे. १३ जणांच्या मृत्यूची चौकशी करण्यात आली असून, उर्वरित १६ जणांच्या मृत्यूचं कारण शोधलं जात आहे, असं नॉर्वे मेडिसीन यंत्रणेनं म्हटलं आहे.

Protected Content