पाचोरा, प्रतिनिधी । गेल्या १२ दिवसांपूर्वी नेरी येथे मामाकडे वास्तव्यास असलेल्या एका २७ वर्षीय युवकाचा पुरात वाहुन गेल्याने मृत्यू झाला होता. मयताच्या आईस मदतीचा हात म्हणुन आमदार किशोर पाटील, उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल व तहसिलदार कैलास चावडे यांचे हस्ते चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला.
लोहारी बु” ता. पाचोरा येथील सचिन भगवान पाटील (वय २७) हा युवक नेरी ता. पाचोरा येथे राहत असलेल्या त्याचे मामाकडे वास्तव्यास होता. गेल्या १२ दिवसांपूर्वी नेरी येथील मामांच्या शेतात जात असतांना गडद नदीला अचानक पाणी वाढल्याने सचिन पाटील हा पुरात वाहुन गेला होता. सचिन पाटील याचा मृतदेह घटनेपासून तिसऱ्या दिवशी आढळुन आला होता. काही वर्षांपूर्वी पितृछत्र हरपलेल्या सचिन याचे घरची परिस्थिती बेताची असल्याने याविषयी प्रशासनाने दखल घेत त्याचे वृद्ध आई मंगलाबाई भगवान पाटील यांना आधार म्हणून चार लाख रुपयांचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी याचे आई मंगलाबाई भगवान पाटील यांना आमदार किशोर पाटील यांच्या हस्ते चार लाख रुपयाचा धनादेश सुपूर्द करण्यात आला. यावेळी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसीलदार कैलास चावडे लोहारी येथील चिंधा बडगुजर, संदीप पाटील, सतीश पाटील, नरेंद्र बडगुजर, यशोदीप पाटील, हिरामण बडगुजर, दिनकर बडगुजर, महेंद्र बडगुजर, प्रशांत पाटील, सुनील पाटील, योगेश पाटील, कैलास पाटील उपस्थित होते.