नेपाळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । नेपाळच्या यति एअरलाईन्स विमान पोखरा येथे लॅन्डिग करत असतांना जमिनीवर आदळल्याची घटना घडली आहे. यात ३० प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. विमान खाली कोसळताच अचानक आगीने पेट घेतला होता. या दुर्घटनेत अनेक प्रवाशी जखमी झाल्यावे वृत्त समोर आले आहे.
विमान कोळल्यानंतर बचावकार्य सुरू करण्यात आले असून या घटनेचे व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. बचावकार्य करतानाचे फोटो समोर आले आहे. विमानाचा अपघात झाल्यानंतर आगीचे लोट आणि मोठ्या प्रमाणात धुराचे लोट असल्यामुळे बचावकार्य करताना अडचणी येत असल्याचं दिसतेय. मृताची संख्या वाढण्याची शक्यता आहे. दुर्घटनाग्रस्त विमानात दहा विदेशी नागरिक प्रवास करत असल्याचं समोर आले आहे. यामध्ये पाच भारतीय होते.
हवामान खराब असतानाही यती एअरलाइनच्या एटीआर-७२ विमानाने उड्डाण केल्याचं समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, पायलट कॅप्टन कमल केसी हे विमान उडवत होते. पोखरा येथील सेती खोच येथे हे विमान कोसळले असून त्यानंतर विमानाला आग लागली.