नूतन मराठा महाविद्यालयात नाट्यशास्त्र व संगीत विभागाचे उदघाटन

 

जळगाव, प्रतिनिधी । येथील नूतन मराठा महाविद्यालयात विद्यार्थ्यांच्या सांस्कृतिक विकासासाठी प्रोत्साहन म्हणून नाट्यशास्त्र व संगीत विभागाचे उदघाटन करण्यात आले आहे.

याप्रसंगी महाविद्यालयातील रंगकर्मी नाटककार अनिल मोरे, उपप्राचार्य डॉ. एन.जे.पाटील, डॉ.आर बी देशमुख,डॉ पी.बी. देशमुख,नाट्यशास्त्र विभाग प्रमुख प्रा.राहुल संदानशिव, प्रा.डॉ.डी. आर.चव्हाण,प्रा.डॉ.अफाक शेख, प्रा.वानखेडे उपस्थित होते. प्राचार्य डॉ.एल.पी.देशमुख यांच्या हस्ते उदघाटन झाले. याप्रसंगी प्राचार्य देशमुख यांनी विद्यार्थाना मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांनी अभिनय कला जोपासण्यासाठी शास्त्रोक्त प्रशिक्षण घ्यावे. त्यासाठी नाट्यशास्त्रचा अभ्यासक्रम करून अभिनयातील बारकावे शिकले पाहिजे, असे प्राचार्य देशमुख यांनी सांगितले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी हनुमान सुरवसे, हर्षल वानखेडे,धनराज सानप,सुनील परदेशी, हर्षल परदेशी, सागर भडगर, विलास पाटील, जयेश साळुंखे, श्रीकांत चौधरी, प्रेम बडगुजर यांनी परिश्रम घेतले. सध्या विभागात विद्यापीठांतर्गत १ वर्षांचा अभ्यासक्रम सुरू करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पल्लवी शिंपी तर आभार विभागप्रमुख प्रा.राहुल संदनशिव यांनी केले.

Protected Content